लवकरच गौरी गणपती हा सण येत आहे.गौरीलाच काही भागात महालक्ष्मी असे म्हणतात.गौरीची मनोभावे पूजा केली जाते.
अनुराग नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाते.दुसऱ्या दिवशी जेष्ठ नक्षत्रावर गौरींचे पूजन असते,म्हणून त्यांना जेष्ठ गौरी गणपती असे म्हणतात.
ज्येष्ठा गौरी चा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.तर आज आपण या लेखात गौरी गणपती माहिती पाहणार आहोत .
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष यात अनुराधा नक्षत्रावर जेष्ठ गौरी चे घरोघरी आगमन होते.
या वर्षी 21 सप्टेंबर रोजी जेष्ठ गौरी चे आगमन आहे. गौरी गणपती हा सण तीन दिवस असतो.
ज्येष्ठागौरी आवाहन : गुरुवार, २१ सप्टेंबर २०२३
भाद्रपद सप्तमी प्रारंभ : गुरुवार, २१ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजून १६ मिनिटे.
भाद्रपद सप्तमी समाप्ती : शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजून ३४ मिनिटे.
गौरी आवाहन दुपारी ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत करावे.
गौरी आवाहन गुरुवार २१ सप्टेंबर २०२३
ह्या ३ दिवसाच्या सणामध्ये पहिला दिवस गौरी आवाहनाचा असतो. ह्या दिवशी आपापल्या परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढतात.
- हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवून, त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात.
- आत येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणावेत. गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे.
- गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात.
- आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना करावी. अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे, असे संबोधतात.
गौरी पूजन शुक्रवार २२ सप्टेंबर २०२३
- दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाचा असतो. दुपारी १२ वाजेपर्यंत गौरीला नैवेद्य दाखवावा.
- या दिवशी काही सगेसोयरीक जेवणाला सांगितले जातात. गौरी पूजन आणि आरती करतात तसेच जेवायला पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.
- नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी करतात.
गौरी विसर्जन शनिवार २३ सप्टेंबर २०२३
- तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जनाचा असतो. यादिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात.
- यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात.
- या तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते.
- (धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.
- सकाळी ९ ते दुपारी २ वाजून ५६ मिनिटापर्यंत ज्येष्ठा गौरीचे विसर्जन करावे.

गौरीच्या आगमनाचा मुहूर्त काय आहे ते पाहू.
अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्रीया भाद्रपद शुक्ल पक्ष यात गौरीचे पूजन करतात.
गौरी पुजनामागील कथा
पुराणानुसार असुराच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौ भाग्य अक्षय करण्यासाठी गौरी ला शरण गेल्या.त्यांनी गौरीला प्रा थना केली. व गौरी ने भाद्रपद शुक्ल अष्टमी ला असुराचा संहार केला.त्यांमुळे अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्रीया जेष्ठ गौरी चे व्रत करतात .
गौरीचे पूजन जेष्ठ नक्षत्रावर केले जातात .म्हणून त्यांना जेष्ठ गौरी असे म्हणले जातात.
घरामध्ये गौरीची स्थापना कशी केली जाते –
गौरीला साठी नेसविली जाते , तिला नाटवळे जाते,तिला सौ भाग्य स्री सारखे सर्व अलंकार घातले जातात.आणि बाहेरील सुवासिनी यांच्या हातून आणले जाते.
गौरी गणपतीच्या दिवशी सोळा सुवासिनींना जेवू घालतात. महाराष्ट्रात भागाभागानुसर गौरी गणपती ची स्थापना वेगवेगळी केली जाते.काही भागात नुसते मुखवटे असतात तर काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असते.शुभ मुहूर्त पाहून मुखवट्या ची पूजा केली जाते.
ज्येष्ठा गौरी चे आगमन कसे केले जाते –
आगमनाच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून लक्ष्मीच्या मुखट्याताची पूजा केली जाते.त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात.
या गौरी या सखी पार्वती सह त्यांचे मुले म्हणजे एक मुलगा,एक मुलगी असे मानतात.
धातूच्या लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा केली जाते.लक्ष्मी बसवण्याच्या दिवशी घराबाहेर असलेले तुळशी वृंदावन पासून ते लक्ष्मी बसवण्याच्या जगेपर्यात लक्ष्मीचे पाऊले रागोलीने काढ.
लक्ष्मी घेऊन आलेल्या बाईचे पाय पाण्याने धुऊन काढ. व कुकवाचे स्वस्तिक काढतात.लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटत उमटत आनावे,तसेच लक्ष्मीचे वाजत गाजत स्वागत करावे.आपले सर्व घर फिरून दाखवावे म्हणजे आपले सर्व घर सुख,समृध्दी याने टीकुन राहील व सुख शांती,
टिकून राहावी अशी प्रार्थना करू.गौरी घरात येत असताना घरात ठेवलेल्या धान्याला पाय लावून तिला घरात आणले जातात.तिच्या हातात गौराई असते तिचे पाय धुतले जातात.तिला इतर स्त्रिया कडून हळदी कुंकू लावले जाते.
पहिल्या दिवशी गौरी चे आगमन होते.
दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू चा कार्यक्रम असतो.आणि सुवशिनीला जेवू घालतात.
तिसऱ्या दिवशी नैवद्य दाखवून गौरीचे विसर्जन केले जातात.
पहिल्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो.
दुसऱ्या दिवशी जेष्ठ नक्षत्रात गौरीची पूजा केली जाते.
सकाळी महालक्ष्मीची पूजा आरती केल्यानंतर फराळ केले जाते . फरालामध्ये रव्याचे लाडू,शकरपाले,शेव,चकली, करंजी असे पदार्थ असतात व नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. व तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते.
गौरी व गणपती मधील नेमक नात काय आहे
बऱ्याच भागात गौरी ही गणपतीची बहिण मानली जाते.म्हणून ती भावाकडे पाहुणचार साठी येते.असे म्हणतात.
तर तुम्हाला आमचा गौरी गणपतीची माहिती हा लेख कसा वाटला .
संदर्भ
१.गणपती व गौरी यांच्यात नातं काय| गौरी गणपति विषयी माहिती| ज्येष्ठागौरी पूजन|