येत्या २ वर्षात Chat GPT हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल गुगल सर्च इंजिन ला हानिकारक ठरू शकते . हे वक्तव्य आहे Paul Buccheit यांचे.
कोण आहे Paul Buccheit ?
Paul Buccheit हे गुगल च्या ईमेल सर्विस जि-मेल चे फाऊंडर आहेत , तसेच त्यांनी गुगल अॅडसेन्स चा पाया रचला होता. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वर एक ट्विट केले ज्यात त्यांनी म्हटले की ChatGPT मध्ये येत्या एक दोन वर्षात गुगल सर्च ला पूर्ण पणे भुईसपाट करण्याची क्षमता आहे .
Paul Buccheit च्या मते गुगल साठी पूर्ण पणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्यास मर्यादा येतील कारण कंपनीचे काही महत्वाचे पैलू या साठी बदलावे लागतील, ते बदलल्या शिवाय AI चा पूर्ण वापर गुगल साठी अशक्य आहे.
Buccheit यांना पूर्ण विश्वास आहे की Chat GPT गुगल च्या सर्वात आकर्षित प्रॉडक्ट ला म्हणजेच गुगल सर्च ला पूर्णतः काढून टाकेल. आणि एकदा जर गुगल सर्च गेले की गुगल च्या इतर सहायक सेवा आपोआपच प्रभावित होवून कमी होतील.
काय आहे Chat GPT ?
नोव्हेंबर 2022 मध्ये पदार्पण झाल्यापासून, OpenAI चे चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर, किंवा ChatGPT हे सामान्यपणे ओळखले जाते, त्यामुळे बरीच चर्चा निर्माण झाली आहे.
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, ChatGPT हा मुळात एक प्रोटोटाइप AI चॅटबॉट आहे जो मजकूर इनपुटचा वापर करतो आणि त्याला AI वापरून उत्तर देतो.
खरी आकर्षक गोष्ट ही आहे की ते नैसर्गिकरित्या संभाषण करण्यासाठी तयार केले गेले आहे. म्हणजे ते थोडेसे यूजर साठी फ्लेक्सिबल आहे.
आता पर्यंतचे ChatGPT चे रिजल्ट्स खूपच आश्चर्य करणारे आहेत , ज्याला जगातील बहुतांश लोकांनी वापरले आहे . आणि त्याचा वापर वाढतच चालला आहे. Chat GPT च्या निर्माती Open AI या कंपनी ने Chat GPT ची सशुल्क आवृत्ती काढण्याची देखील तयारी दर्शवली आहे.
इतक्या कमी कालावधीत Chat GPT ला मिळालेल्या प्रसिद्धी मुळे , गुगल साठी एक डोकेदुखी झाली आहे. ChatGPT ने Google च्या सर्वात तणावपूर्ण काळात सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर प्रचंड दबाव निर्माण केला आहे.
गुगल, आतापर्यंत AI प्रकल्पांबद्दल अत्यंत सावध आणि सावध राहिले आहे. कारण AI चा अयोग्य वापर जगासाठी खूपच घातक होवू शकतो. AI जर योग्यरित्या अंमलात आणले नाही तर संभाव्य नुकसान होण्याची भीती आहे. आणि आजही गुगल हे विश्वासू सर्च इंजिन आहे. तसे पाहता Chat GPT हा फक्त एक प्रयोग आहे. त्याच्यात देखील खूप चुका आहेत. त्या चुका गुगल करू शकत नाही. कारण त्याचा परिणाम सर्च इंजिन वर मोठया प्रमाणावर होतो. आणि सर्च रिजल्ट अगदी अचूक पणे येईलच या वर शंका आहे.
संदर्भ
२. Alarm bells for Google: ChatGPT can destroy Google Search in two years, says Gmail creator (msn.com)