Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

संत शिरोमणी कबीरदास हे १५ व्या शताब्दीचे अनमोल रत्न आहे. त्यांनी भारतीय जनतेला जनजागृतीचा हा महत्त्वाचा उपदेश दिला आहे. कबीरांचे जीवन चरित्र हे खूप साऱ्या अज्ञात आणि अनमोल गोष्टी यांनी भरलेले होते.

कबीर यांच्या जन्माची वेळ-

काही गोष्टीतून अशी माहिती मिळाली आहे की कबीर यांचा जन्म नामदेव आणि जय देव यांच्या नंतर झाला आहे. कबीर यांच्यासारखे संत हे नामदेव आणि जय देव यांचे परवर्ती सिद्ध झाले आहे .
अंतर साक्षच्या रूपामध्ये कबीरदास यांनी या ओळीची रचना केली आहे.
गुरु परसादी जे देव नामा |
भक्ती क प्रेम इन्हही हे जाना |

कबीर यांचे कूल आणि परिचय –

कबीर यांचा जन्म १४३८ मध्ये एका गरीब विधवा ब्राह्मणीच्या पोटी झाला असे म्हटले जाते. संसाराची बदनामी झाल्यामुळे विधवा ब्राम्हणीने नवजात बालकाला लहरतरा ता. कदाचित त्यामुळेच कबीर बाहेरच्या चालीरीतींवर टीका करताना ऐकले गेले.

कबीरांचे जीवन चरित्र कबीर यांनी आपल्या कुळा बद्दल सांगितले आहे. खालील काही ओळीत,
पूरब जनम हम ब्राह्मण होते |
ओछे करम तप हिना |
रामदेव की सेवा चुका|
पकरी जुलाहा किन्हा ||
यातून असे स्पष्ट होते की कबीरदास हे ब्राह्मण होते .हे कूल हिंदू धर्मापेक्षा खूप मोठे होते. यात परमात्म्याची भक्ती संस्कार पण होते.

एका परंपरेनुसार नीरू आणि नीमा यांच्या घरी मुस्लिम कुटुंबात कबीराचे पालनपोषण झाले. लहरतरा ता.जवळ नीरूने या तरुणाचा शोध लावला होता. कबीर यांच्या आई-वडिलांची ओळख हा वादाचा विषय आहे.

कबीर यांची जन्मतारीख-

कबीर यांच्या जन्माविषयात त्यांनी एक दोहा लिहिला आहे. तो खालील प्रमाणे आहे,
चोदह सो पचपण साल गये | चंद्रवार एक थाट गये |
जेठ खुदी बरसायात की |
पुरण मासी प्रगट गये ||
कबीर यांची जन्मतारीख 1455 सालाच्या ज्येष्ठ महिन्यात आहे.

कबिरांचे जन्म ठिकाण

कबीर यांचे जन्म ठिकाण हे तीन जागी मानले जाते.
१) मगहर.
२)बैलहरा.
३) काशी.

मगहर

बेलहरा

काशी

१) मगहर

कबीर यांनी मगहर या ठिकाणाचा उल्लेख बऱ्याच वेळा केला आहे. म्हणून विद्वान संत हे मगहर हे कबीरांच्या जन्मस्थान मानतात. संत कबीर हे मृत्यूच्या वेळेस काशी मधून मगहर ला गेले होते .
त्यामधून त्यांनी काही ओळी लिहिले आहे,
पहिले दर्शन मगहर पायो |
पुनि काशी बसे आई ||

२)बैलहरा –

बैलहरा हे गाव आझमगड जिल्ह्यात आहे. बेलहरा गावात बेलहर नावाचा एक तलाव होता. यालाच लहर लाल पण म्हटले आहे.

३)काशी

कबीर यांचा जन्मस्थान काशी आहे .हे अंतर साक्षमध्ये सागतात.
सरल जनम शिवपुरी गवाइया | भरती वार मगहरी उठी धाइया ||
कीवा
तू ब्राह्मण मे काशी का जुलाहा ||मगहर ,बैलहरा आणि काशी या मधून काशी हे कबीरदास यांचे जन्मस्थान मानले आहे.

कबीरदास यांचे नाव –

कबीरदास त्यांचे जन्मस्थान आणि जन्मतीथि ही विवादात आहे .पण कबीर यांचे नाव हे विवादात नाही .हे वेगळे आहे की कबीर यांचे नाव बऱ्याच वेगळ्या रूपात मिळते .कबीर दास ,कबीर जन ,कबीर असे आहे ,
त्यारूपामध्ये कबीर यांनी काही ओळी लिहिल्या आहेत.
कबीर तू ही कबीर ,

तू तोरो नाम कबीर ||

कबीर यांचे वय –

कबीर यांना लंबी आयु मिळाली होती .ते 120 वर्षापर्यंत जिवंत होते .
रामजीलाल सहायक असे म्हटले आहे ,की कबीर यांचे बालपण हे खेळण्यांमध्ये गेले होते .तर त्यांचे तरुण पण हे गृहस्थीमध्ये आणि प्रौढपण ग्रहस्थ जीवन आणि साधना यामध्ये गेले होते. कबीर यांनी त्यांची द्ववस्था निष्काम कर्मयोगी आणि परमहंस या स्थितीत मध्ये काढली होती .
120 वर्षाच्या वयात त्यांना योगसाधना प्राप्त झाली.

कबिरांची ग्रहस्ती –

कबीर यांच्या परिवारात काही सदस्य होते .त्यांचे नाव खालील प्रमाणे आहे,
कबीर यांच्या वडिलांचे नाव निम होते.
त्यांच्या आईचे नाव निमा होते. पत्नीचे नाव लोई होते .त्यांच्या मुलाचे नाव कमाल ,आणि मुलीचे नाव कमाली होते.
काही विद्वान असे म्हणतात की, कबीर यांना दोन पत्नी होत्या. एका पत्नीचे नाव लोई आणि दुसऱ्या पत्नीचे नाव रमजानिया होते .कबीर यांना मुलं पण होते कबीर यांना दोन मुले होते एक मुलगा आणि एक मुलगी.

कबीर यांचा जाती व्यवसाय –

कबीरदास यांच्या जाती आणि व्यवसाय याबद्दल पण विवाद होता .या संबंधात विद्वानाचे तीन मत आहे,
१) कबीर हे रागीट होते.
२) कबीर जोगी होते.
३) कबीर कोरी कीवा जुलाहा होते .
तुम्ही हे पण लक्षात ठेवा की, कबीर हे मुसलमान नव्हते .वास्तव मध्ये जूलाहा एक व्यवसाय आहे .त्याला धर्मामध्ये जोडणे बरोबर नाही.
कबीर एक मोठे विद्वान संत होते. जात पात मध्ये त्यांचा विश्वास नव्हता .त्यांना मानवता मध्ये खूप विश्वास होता.ते जीवात्मा आणि परमात्मा मध्ये निवास मानत होते .
अशाप्रकारे स्पष्ट होते की, कबीरदास हे हिंदी प्रतिभाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे संत कवी होते. मानवतावादी चिंतन हे त्यांची अमूल्य धरोहर होती. सेवा करण्याची भावना हा त्यांचा स्वभाव होता .त्यांनी त्यांचे जीवन लोकांच्या कल्याणासाठी अर्पित केले होते.

संदर्भ

  1. संत कबीर यांचे जीवनचरित्र
  2. विकीपेडिया

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo