उन्हाळा सुरू झाला आहे , आणि अनेकांना ऋतु बदलाचा त्रास सुरू झाला आहे . वाढलेले तापमान , बदललेले वातावरण , वाढती गरमी यामुळे अनेकांना अनेक प्रकारचे आजार होतात . सर्दी ताप खोकला याच प्रकारे स्कीन इन्फेक्शन कहा त्रास सुद्धा काहीना मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे . आपण या उन्हाळ्यात वाढत्या गरमी व आजारांवर आहार द्वारे कशी मात करू शकतो ते पाहुयात .
उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या छोट्या छोट्या टिप्सने .
- उन्हाळ्यात दिवसभरा मध्ये 8 ते 10 ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे .
- उन्हाळ्यात त्वचेला थंडावा मिळवा म्हणून गुलाब जलाचा उपयोग करावा
- या ऋतु मध्ये रसयुक्त फळांचा आपल्या आहारात जास्त वापर करावा
- बाहेरून घरी आल्यावर लगेच थंड पाणी पिवू नये किंवा लगेच फॅन खाली बसू नये , या मुले सर्दी होण्याची शक्यता असते .
- महिलांना , मुलांना किंवा वयस्कर व्यक्तींना काम करताना चक्कर येणे , बीपी कहा त्रास जाणवणे असे प्रकार घडू नये म्हणून पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे .
- दुपारच्या वेळेस रणरणत्या उन्हात जाणे टाळावे .
- उष्णते मुळे होणाऱ्या त्वचेच्या त्रासावर कांद्याचा रस फायदेशीर ठरतो . कांदा आपल्या शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतो .
- सब्जा च्या बिया रात्री एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी हे पाणी उपाशी पोटी घेतल्यावर उष्णता कमी होण्यास मदत होते .
- उन्हाळ्या ऋतु मध्ये आपण लिंबू सरबत , कैरीचे पन्हे , अवल्याचे सरबत असे पेय सुद्धा जास्त प्रमाणात घेतली पाहिजेत .
- शक्यतो फ्रीज ऐवजी मातीच्या माडक्यातले पाणी , दही प्यावे .
- रोगप्रतिकरक शक्ति वाढवण्यासाठी ताक , लिंबू , लसूण , तूप , द्राक्षे , शेवगा यांचा आहारात समावेश करावा .
उन्हाळ्यात बाहेर असणे आवश्यक असल्यास
- तुमची घरा बाहेरची कामे दिवसाच्या सकाळच्या किंवा सायंकाळच्या तासांपर्यंत मर्यादित ठेवा.
- सावलीच्या किंवा थंड अश्या जागेवर विश्रांती घ्या.
- रुंद गोलाकार टोपी घाला.
- 15 किंवा त्याहून अधिक सनस्क्रीन वापरा. “ब्रॉड स्पेक्ट्रम” किंवा “UVA/UVB संरक्षण” असे लेबल असलेले उत्पादन निवडा.
- अतिरिक्त पाणी पॅक करा. जर तुम्ही ते प्यायले नाही, तर कदाचित इतर कोणीतरी गरजू असा तुम्हाला भेटू शकतो, ज्याला त्याची गरज भासेल.
काही आजार होण्या आधीच उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या , म्हणजे आपल्याला आजार होणार नाहीत .
———————–
आरोग्य विषयक अधिक लेख इथे वाचा..
संदर्भ :
- विकिपेडिया मुक्त विश्वकोश
- https://www.multco.us इंग्रजी वेबसाईट चा लेख .