अधिक महिना हा तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्याला दान करण्याचे खूप महत्त्व आहे. त्यात दिपदान केल्याने अधिक पुण्य मिळते .रोज सायंकाळी आपण देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावतो. तर अधिक महिन्यातील दीपदाना चे महत्त्व जाणून घेऊ .

अधिक महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेनार्थ दीपदान केले जाते. एक दिवा बरेच दीवे प्रज्वलित करू शकतो. तर विष्णूच्या पूजनार्थ दिपदान करून आपण कायम आठव ठेवला पाहिजे. महर्षी वशिष्ठ सांगतात की दीपदान केल्याने आपल्याला मोक्ष मिळतो.

चातुर्मासात दीपदान केल्यामुळे भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. आणि यावर्षी अधिक महिना हा तर चातुर्मासात आला आहे .चातुर्मासात जर तुम्ही दीपदान केले .तर तुम्हाला खूप पुण्य प्राप्त होते .आणि यावर्षी अधिक मास हा अधिक श्रावण मध्ये आला आहे .दीपदानामुळे धनप्राप्ती आणि पुत्रप्राप्ती होते

सौभाग्यवती श्री यांनी दीपदान केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते .फक्त मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे .जर आपण दोन दिवे दान केले .आणि एका दिव्या मध्ये तिळाचे तेल आणि एका दिव्या मध्ये तूप घालून दीपदान केले .

तर आपल्याला खूप पुण्य मिळते. जर आपण दिवा मंदिरात दान केला तर वर्षभर आपल्याकडून ज्या मंत्र उच्चाराद्वारे चुका होतात .त्या चुका हे मंदिरात दिवा दान केल्याने माफ होतात .जी व्यक्ती वर्षभर दिवेदान करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.अधिक महिन्यातील दीपदाना चे महत्त्व खूप आहे .

अधिक महिन्यातील दिपदान करायचे आहे-

पूर्वीच्या काळामध्ये सुवर्णदीप दान करायचे. पण आता ते शक्य नाही. सोन जरी परवडणार नसल तरी आपण धातूच्या दिव्यांचा दान करू शकतो. धातूच्या दिवादान करताना तुम्ही तांब्याचा ,पितळेचा, चांदीचा यासारखे दिवेदान करू शकतात.

धातूच्या दिव्याचे दान करणे शक्य नसेल तर मातीचा दिवा दान करू शकतात. आणि तो दान करणे प्रत्येकाला शक्य आहे .आणि ते पण शक्य नसले तरी तुम्ही कणकीचे दिवे दान करू शकतात.

दिपदान कसं आणि कुठे करायचे आहे?

तुम्हाला ज्या धातूचा दिवा आणता येईल त्या धातूचा दिवा आणायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा तूप घालायचे आहे. दिव्यामध्ये तेल असेल येत वाती घालायचे आहेत आणि तूप असेल तर फुल वात घालायची आहे .तो दिवा तुम्ही दोन ठिकाणी दान करू शकतात
एक तर तुम्ही मंदिरात दान करू शकतात .आणि दुसरे नदीच्या काठी दान करू शकतात .अधिक महिना हा दानाचा महिना आहे. आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ दान हे दीपदान आहे. अधिक महिन्यात संपूर्ण महिन्यात दीपदान केले तरी चालते .पण सगळ्यांना ते शक्य नसले तर तुम्ही सोमवार आणि गुरुवारी दीपदान करू शकतात.

अधिक महिन्यातील दीपदानाचे महत्त्व

तर अश्या प्रकारे आपण अधिक महिन्यातील दीपदाना चे महत्त्व या लेखात जाणून घेतलं .

संदर्भ

१. युट्युब विडीओ अधिक महिन्यात दीपदानाचे महत्त्व दीपदान कसे व कुठे करावे|दिवा तेलाचा की तुपाचा लावावा| किती वाती|

आमचे इतर लेख