आज आपण अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भातील प्रयोग असे निघते लिंबातून रक्त पाहणार आहोत. या विषयी एक गोष्ट आहे ती मी आज या लेखात सगणार आहे. तर नक्की वाचा ही गोष्ट.
मित्रांनो मानवाच्या पक्षाच्या आणि प्राण्यांच्या शरीरातून रक्त निघताना आपण पाहतो. फळातील रक्त निघताना आपण कधीच पाहत नाहीत .परंतु जेव्हा त्या मंत्रिकाने लिंबू कापता क्षणी त्यातून रक्त निघायला लागते तेव्हा सर्वांच्याच अंगावर शहारे आल्यापासून राहिले नाही.
क्षणभर का होईना आम्हा सर्वांचे भीतीने स्पंदने वाढवायला लागलीत. आमचा एक खेड्यावरचा मित्र प्रकाश सतत शरीराने वाळत चालला होता.
त्याचे खाणे पिणे ही बंद होते. म्हणूनच त्याला गावातील अनुभवी लोकांच्या सांगण्यावरून त्या मोठ्या नावाजलेल्या मांत्रिका कडे नेण्यात आले .
आम्ही जेव्हा त्याच्या दरबारात पोहोचलो तेव्हा तो काहीतरी मंत्र पुटपुटला आणि स्पष्ट सांगितले ,की शेजारच्या दृष्ट बाईने त्याला ठोका केलेला आहे.
ती प्रकाश च्या शरीरातील रक्त आपल्या मंत्र शक्तीने नष्ट करीत आहे. याचा पुरावा म्हणून त्याने आम्हास एक लिंबू मागितले.
मांत्रिका कडे जायचे म्हणजे लिंबू आणि काळा दोरा सोबत न्यायचा अशी आम्हास गावकऱ्यांची पूर्व सूचना दिली होती.
आमच्या जवळचे लिंबू घेऊन त्याने प्रकाशच्या अंगावरून उतारा उतरविला.
त्याने स्वतः जवळचा चाकू घेऊन मंत्र पुटपुटत लिंबावर वार केला.
काय आश्चर्य ,लिंबातून रक्तच टपकायला लागले. मांत्रिक आमच्या समोर बाजी मारून गेला.
अशी होते जादू
आपण रसायनशास्त्रात शिकलेलोच आहे की, मिथील ऑरेंजचे द्रवण लिंबाच्या रसात मिसळल्यास त्याचे रूपांतर लाल रंगात होते.
आणि त्यामुळेच लिंबातून रक्त निघाल्याचा भास होतो.
परंतु लिंबू तर त्याला आम्ही दिले होते आणि त्याने ते आमच्या समक्ष कापले.
मग त्याने मिथेन ऑरेंज त्या लिंबात केव्हा टाकले असावे?
त्यात विशेष असे की लिंबू आमचे असले तरी चाकू त्याचा होता.
आणि त्याने आधीच चाकूच्या पातेला मिथील ऑरेंजचे द्रावण लावून वाळवले होते.
आता आले ना तुमच्या लक्षात लिंबातून रक्त काढण्याचा चमत्कार. तर हा चमत्कार करायला काय हरकत आहे.
अशा प्रकारे आपण बऱ्याच अशा गोष्टी आहे की त्याच्यवर विश्वास ठेवतोय. पण आपलं रसायन इतके पुढे गेले आहे की ,या गोष्टी मागे पडली पाहिजे.
अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज , देशाला लागलेली कीड म्हणजे अंधश्रद्धा ..
कितीतरी लोक असे आहेत की जे या अंधश्रद्धा वर विश्वास ठेवतोत. या साठी समाजातील सर्व स्थरा मधून अंधश्रद्धा निर्मूलन होणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा हा सामाजिक कर्करोग निर्मुलनाचा प्रचंड ध्यास धरून तहान भूक, ऊन पावसाची परवा न करता तन-मन-धनाने सतत झिजून समास्याचे महामेरू पार करीत खंबीरपणे अहोरात्र जीवापाड धडपडणारे साहसी,धुंद कार्यकर्त्याला सादर समर्पण.